संजय गांधी निराधार योजना महाराष्ट्र मराठी | Sanjay Gandhi Niradhar Yojana Maharashtra 2023

Sanjay Gandhi Niradhar Yojana Maharashtra 2023 – संजय गांधी फाउंडेशन ही एक भारतातील ना-नफा संस्था आहे. संजय गांधी यांच्या स्मरणार्थ या संस्थेची स्थापना करण्यात आली होती.

शिक्षण, आरोग्य आणि समुदाय विकास यासह विविध सामाजिक आणि परोपकारी उपक्रमांमध्ये फाउंडेशनचा सहभाग आहे. हे वंचित समुदायांचे जीवनमान सुधारण्यासाठी आणि उपेक्षित गटांच्या कल्याणाला चालना देण्यासाठी कार्य करते. ही संस्था भारतातील वंचित समुदायांना भेडसावणाऱ्या सामाजिक आणि आर्थिक आव्हानांना तोंड देण्यासाठी विविध कार्यक्रम आणि उपक्रम राबवते.

संजय गांधी निराधार योजना महाराष्ट्र मराठी

 

या फाऊंडेशन ला सामान्य व्यक्ती आणि संस्थांच्या देणग्यांद्वारे निधी दिला जातो आणि त्याला स्वयंसेवक आणि भागीदारांद्वारे पाठिंबा दिला जातो. “Sanjay Gandhi Niradhar Yojana Maharashtra marathi 2023”

{tocify} $title={अनुक्रमणिका } 

Sanjay Gandhi Niradhar Yojana Maharashtra 2023


संजय गांधी निराधार योजना महाराष्ट्र: महाराष्ट्राचा एक सामाजिक न्याय व विशेष सहाय्य योजना विभाग आहे. या महाराष्ट्र शासनाच्या विभागामार्फत प्रत्येक तालुक्याच्या कार्यालयात एक संजय गांधी निराधार योजना ही चालू असते. या संजय गांधी निराधार योजने मार्फत वयोवृद्ध स्त्री पुरुष,निराधार स्त्री-पुरुष, निराधार बालके, निराधार विधवा महिला, परितक्त्या स्त्रिया,दुर्मिळ आजार असलेले स्त्री पुरुष अशा निराधार व्यक्तींसाठी संजय गांधी निराधार योजने मार्फत अनुदान वितरित केले जाते.

संजय गांधी निराधार योजना महाराष्ट्र


1980 पासून ही योजना सुरू करण्यात आली आहे.तालुक्याच्या प्रत्येक तहसील कार्यालयामध्ये संजय गांधी निराधार योजना नावाचा एक विभाग असतो. या ठिकाणी एक नायक तहसीलदार असतो, दोन कारकून असतात,दोन लिपिक असतात अशा पद्धतीने दर महिन्याला जे काही अनुदान वाटप करायचं असतं तर ते अनुदान हे महाराष्ट्र शासनाकडून येत असते आणि त्या प्रणालीवरून प्रत्येक लाभार्थीच्या अकाउंट वर जे आधार लिंक असते त्या अकाउंट वर महाराष्ट्र सरकार रुपये 1000 वाटप करत असते.

यापूर्वी सहाशे रुपये अनुदान दिले जात होते. चारशे रुपये राज्य सरकार देत होते आणि दोनशे रुपये हे केंद्र सरकार देत होते, आता याच्यामध्ये वाढ होऊन 600 रुपये राज्य सरकार देते आणि चारशे रुपये केंद्र सरकार देते. असे हजार रुपये आता सुरू झाले आहेत.

ही अतिशय चांगली योजना आहे. या योजनेमार्फत जे ग्रामीण भागातील लोक आहेत किंवा शहरी भागातील लोक आहेत. जे बी.पी.एल. असलेले गोरगरीब विकलांग,वयोवृद्ध ,ज्यांना कुणाचाच आधार नाही, उदरनिर्वाहाचं कुठलंच साधन नाही,विधवा महिला, परितक्त्या महिला अशा महिलांसाठी-पुरुषांसाठी अतिशय चांगली योजना आहे. या अनुदानाच्या माध्यमातून त्यांचा उदरनिर्वाह होण्यासाठी खूप मदत होते. संजय गांधी निराधार योजनेमध्ये अजून कोणत्या योजना समाविष्ट आहेत हे आपण पाहणार आहोत. Sanjay Gandhi Niradhar Yojana Maharashtra 2023

संजय गांधी निराधार अनुदान योजना मराठी 


यामध्ये 100 रुपये एवढे मासिक अनुदान मिळते. 65 वर्षापेक्षा ज्या व्यक्तींचे वय कमी आहे अशा व्यक्तींना हे अनुदान मिळते.

संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी लागणारे कागदपत्रे पुढील प्रमाणे आहेत :-


विहित नमुन्यातील अर्ज

एल.सी.सर्टिफिकेट

आधार कार्ड

रहिवासी दाखला

21 हजार रुपये उत्पन्न असलेला दाखला

बी.पी.एल. प्रमाणपत्र

निराधार असल्याच declaration

जर महिला विधवा असेल तर त्याचं प्रमाणपत्र


इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग योजना


या योजनेमध्ये ही प्रतिमाह प्रत्येकी हजार रुपये वितरित केले जातात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी 18 ते 35 वय असणे गरजेचे आहे.

इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग व्यक्तीसाठी पुढील प्रमाणे कागदपत्रे आवश्यक आहेत :-


80% पेक्षा जास्त अपंग असल्याचे प्रमाणपत्र

उत्पन्नाचा दाखला

प्रतिज्ञापत्र

शाळा सोडल्याचा दाखला

बी.पी.एल. प्रमाणपत्र

विहित नमुन्यातील अर्ज

रेशन कार्ड

मतदान कार्ड

आणि प्रतीज्ञापत्र


 ‘Sanjay Gandhi Niradhar Yojana Maharashtra 2023’

इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा योजना


40 ते 65 वर्षापेक्षा कमी वयोगटातील विधवा महिलांसाठी ही योजना आहे. या योजनेमध्ये प्रतिमाह प्रत्येकी हजार रुपये वितरित केले जातात.

इंदिरा गांधी राष्ट्रीय गीत यासाठी पुढील प्रमाणे कागदपत्रे आवश्यक आहेत :-


 1. विहीत नमुन्यातील अर्ज
 2. अर्जदाराचा वयाचा पुरावा
 3. मुळ बी.पी.एल. दाखला कुटुंब पत्रक
 4. पतीचा मुळ मृत्यू दाखला
 5. आधार कार्ड
 6. मतदान कार्ड
 7. रेशन कार्ड
 8. रहिवासी दाखला
 9. मुलांचा खुलासा
 10. प्रतिज्ञापत्र [Sanjay Gandhi Niradhar Yojana Maharashtra 2023]
 11. इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना

या योजनेमध्ये प्रतिमा प्रत्येकी हजार रुपये वितरित केले जातात. 65 व 65 वर्षापेक्षा जास्त वयोगटातील व्यक्तींसाठी ही योजना आहे.

इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना यासाठी पुढील प्रमाणे कागदपत्रे आवश्यक आहेत 

 • विहित नमुन्यातील अर्ज
 • मूळ बीपीएल दाखला कुटुंब पत्रक
 • रहिवासी दाखला
 • वयाचा पुरावा
 • मतदान कार्ड
 • रेशन कार्ड
 • उत्पन्नाचा दाखला
 • मुलांचा खुलासा
 • प्रतिज्ञापत्र [Sanjay Gandhi Niradhar Yojana Maharashtra 2023]

श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना


ही योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजनेसारखीच आहे. परंतु ज्या व्यक्तींकडे मूळ बीपीएल दाखला कुटुंब पत्रक नाही त्या व्यक्तींसाठी ही योजना आहे.

श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना यासाठी पुढील प्रमाणे कागदपत्रे आवश्यक आहेत :-

 
 • विहित नमुन्यातील अर्ज
 • उत्पन्नाचा दाखला
 • वयाचा पुरावा
 • मतदान कार्ड
 • रेशन कार्ड
 • प्रतिज्ञापत्र
 • रहिवासी दाखला

राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना


18 ते 59 वयोगटातील दारिद्र्य रेषेखालील नोंद असलेल्या कुटुंबातील करता पुरुष मरण पावल्यास या योजनेचा लाभ होतो. या योजनेसाठी विधवा महिलेने अर्ज केला पाहिजे. या योजनेमध्ये वीस हजार ही संपूर्ण रक्कम एकदाच दिली जाते.

राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेसाठी पुढील प्रमाणे कागदपत्रे आवश्यक आहेत :-

 
 • विहीत नमुन्यातील अर्ज
 • अर्जदाराचा वयाचा पुरावा व मरण पावलेल्या व्यक्तीचे एल.सी.
 • मूळ बी.पी.एल. दाखला कुटुंब पत्रक
 • मृत्यू दाखला (तीन वर्षाआतील)
 • आधार कार्ड (मृत्यू व्यक्ती व अर्जदार)
 • मतदान कार्ड( मृत्यू व्यक्ती व अर्जदार)
 • कुटुंब लाभ योजनेसाठी जोडलेली कागदपत्रे असल्याचे प्रमाणपत्र
 • स्वयंघोषणापत्र “Sanjay Gandhi Niradhar Yojana Maharashtra 2023”

Post a Comment

Previous Post Next Post